Maharashtra Politics : साताऱ्यात भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार? पाहा VIDEO

Sharad Pawar Vs BJP In Satara : साताऱ्यामध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भेटीगाठींना उधाण आलंय.

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. दरम्यान राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. शरद पवार वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मदन भोसले यांच्या निवासस्थानी भेटीला गेले आहेत, त्यामुळे चर्चांणा उधाण आलंय.

वाई मतदारसंघात भाजपचे नेते मदन भोसले यांचं राजकीय वजन आहे. त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जयंत पाटलांनी मदन भोसलेंची भेट घेतल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून भाजप, अजित पवार गटामधील अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे विधानसभेआधी अनेकजण तुतारी हाती घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जयंत पाटील आणि मदन भोसलेंमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com