Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांनी घेतली अमित शाह यांची भेट! Video समोर, भेटीदरम्यान काय चर्चा?

Eknath Khadse meet Amit Shah Video: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतील अमित शाह यांची भेट, सदिच्छा भेट असल्याची माहिती

नवी दिल्ली : एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. दिल्लीत ही भेट झाल्याची माहिती समोर आलीआहे. केंद्री राज्यमंत्री रक्षा खडसे यादेखील एकनाथ खडसे यांच्यासोबत भेटीदरम्यान होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. खडसे लवकरच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चांना या भेटीमुळे उधाण आलं आहे. दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, असं सांगितलं जातंय. या भेटीदरम्यान अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सून रक्षा खडसे यांच्यासाठी भाजपला पाठिंबा देत महत्त्वाची राजकीय भूमिका बजावली होती. रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या रक्षा खडसे यांच्या विजयात एकनाथ खडसे यांचाही मोठा वाटा होता. दरम्यान, आता खडसे यांना भाजपात पुन्हा अधिकृत प्रवेश कधी होतो? हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com