बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 560 कोटींचा निधी मंजूर|VIDEO

Maharashtra Faces Rising Leopard Attacks: महाराष्ट्रात 29 जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वाढता उच्छाद पाहता राज्य सरकारनं वनविभागाला 560 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक येथे 1800 बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे.

सध्या राज्यामध्ये 29 जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा हैदोस माजला असून अनेकांचे प्राण गेले आहेत. बिबटे आणि मानव संघर्षावर आळा घालण्यासाठी वन विभागाला 560 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासह पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात 1800 बिबटे ठेवण्यासाठी जंगलामध्ये रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत.

राज्यामध्ये सातारा, नाशिक, पुणे, बुलढाणा, नागपूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने प्रशासन अस्वस्थ झाले आहे. बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता 560 कोटींचा निधी वनविभागाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com