IAS Transfer: १२ दिवसात पुन्हा बदली; IAS जी श्रीकांत आता विभागीय आयुक्त

Chhatrapati Sambhaji Nagar IAS G Shreekant Transfer in Just 12 Days: छत्रपती संभाजीनगरचे माजी आयुक्त जी श्रीकांत यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांची १२ दिवसातच पुन्हा बदली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी आयुक्त जी. श्रीकांत यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. अवघ्या १२ दिवसांत त्यांचे पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनरागमन झालं आहे. ३ एप्रिलला त्यांची मुंबईत 'जलजीवन मिशन'मध्ये बदली झाली होती. मात्र आता त्यांची नियुक्ती 'मराठवाडा विभागीय आयुक्त' म्हणून करण्यात आली आहे. 3 एप्रिलला जी. श्रीकांत यांची बदली झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. आता मात्र त्यांची पुन्हा बदली होऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त म्हणून ते रुजू होणार आहेत. जी. श्रीकांत यांची बदली दोन आठवड्यापूर्वीच झाली होती. तेव्हापासून पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना शहरातच ठेवावे, अशी आग्रही मागणी या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीचा विचार करत त्यांना पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्टिंग देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com