PM मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, VIDEO

fadnavis government responds to pm modi appeal : सोनं खरेदी टाळा, विदेशात वर्षभर प्रवास करू नका, पेट्रोल-डीझेल आणि गॅसचा वापर जपून करा या पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनं प्रतिसाद दिला आहे. त्यादृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

पुढील वर्षभर सोनं खरेदी टाळा, विदेशात फिरायला जाऊ नका, इंधन म्हणजेच पेट्रोल-डीझेल आणि गॅसचा वापर संयमाने करावा. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन बैठका घेण्यावर भर देण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, रविवारी भारतीयांना केलं होतं. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे. या आवाहनानंतर महाराष्ट्रातील फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने खर्चात कपातीचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ परदेशात जाणार नाही, अशी घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली. याशिवाय मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करून ईव्ही (EV) गाड्यांचा वापर वाढवणार आहेत. तर उद्यापासून विभागाच्या सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार आहेत, असे ते म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com