Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची बैठक; काय निर्णय घेणार?

CM Devendra Fadnavis Today Meeting : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अनेक नवीन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांचा महत्वाची बैठक; काय निर्णय घेणार?
CM Devendra Fadnavis Today MeetingSaam Tv
Published On
Summary
  • गॅस आणि पेट्रोल टंचाईच्या अफवा

  • देशात कोणताही लॉकडाऊन लागू होणार नाही

  • अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

  • फडणवीसांची महत्त्वाची बैठक आज

आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाला एक महिना पूर्ण झाला असून इराण-इस्त्राईल अमेरीका युद्ध दिवसेंदिवस वाढत आहे. या युद्धामुळे भारतात गॅस आणि इंधन टंचाईच्या अफवेमुळे देश भरतील नागरिक चिंतेत आले आहेत. मात्र आता ही अफवा खोटी असून पेट्रोल आणि गॅस सेवा सुरळीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी काल झालेल्या बैठकीत म्हटले. तसेच देशात कोणत्याही प्रकारचा लोकडाऊन नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

आखाती युद्धामुळे राज्यात गेल्या काही दिवसांत गॅस, पेट्रोल संदर्भात अनेक अफवा पसरवल्या गेल्या. गॅस तुटवड्याचा फायदा घेत सायबर भामट्यांनी संधी साधूपणा करत नागरिकांची फसवणूक देखील केली. तसेच पेट्रोल संपल्याच्या अफवेने अनेक जणांनी पंपावर कॅन, ड्रम घेऊन लांबलचक रांगा लावल्या.

अशातच २०२० सारखे लॉक डाऊन लागणार असल्याचे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाले. मात्र या फक्त अफवा असून, अशा प्रकारचा कोणताही लॉक डाऊन लागणार नसल्याचे काल पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत म्हटले.

Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांचा महत्वाची बैठक; काय निर्णय घेणार?
Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; आजचे हवामान कसे असेल? वाचा

दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत युद्धजन्य परिस्थितीवर तसेच राज्यातील परिस्थितीवर बोलणार आहेत. आता या बैठकीत कोणते नवीन निर्णय घेण्यात येतील हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com