केंद्र सरकारकडून निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२९ पर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ७२ आणि विधानसभेच्या जागा ४३२ होऊ शकतात. तसंच लोकसभेतील सदस्यसंख्या ८१६ पर्यंत वाढू शकते. ज्यामुळे महिला आरक्षणासाठी राखीव जागांची संख्या २७३ होण्याचा अंदाज आहे. जागावाटपासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बीजेडी, शिवसेना आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका झाल्यात. विधेयकावर एकमत घडवून आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. विधेयकावर एकमत झाल्यानंतर विधानसभा, लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.