Assembly Election : नाशिक विधानसभेच्या जागा वाटपावरून जुंपली: शरद पवार अन् ठाकरे गटात वाद होणार? पाहा VIDEO

MVA Seat Sharing Crisis : जागावाटपावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे दोघांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय.

मुंबई : नाशिकमधून मोठी बातमी समोर आलीय. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० जागांवर दावा केलाय. अजित पवार गटात गेलेल्या ६ विद्यमान आमदारांच्या ६ जागांसह ग्रामीण आणि शहरातील प्रत्येकी २ जागांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही असल्याचं दिसत आहे.

निफाड, येवला, दिंडोरी, देवळाली, सिन्नर, कळवणसह चांदवड, मालेगाव मध्य आणि शहरामधील नाशिक पश्चिम, नाशिक मध्य अथवा नाशिक पूर्व अशा १० जागांसाठी आग्रही असल्याचं समोर आलंय. नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यच्या जागेवर याआधीच उद्धव ठाकरे गटाने दावा करत प्रचाराला देखील सुरुवात केलीय. तर जिल्ह्यातील १० जागांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अहवाल सोपवला आहे. त्यामुळे मविआत नाशिक विधानसभेवरून वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com