Sharad Pawar Madha | शरद पवारांनी रात्रीतून सूत्र फिरवली...माढ्यात एका रात्रीत बंड थंड!

माहितीनुसार रात्री उशिरा शरद पवार आणि अनिकेत देशमुख यांच्यात भेट झालीये आणि भेटीनंतर अनिकेत देशमुख यांचे बंड थंड झालंय. अनिकेत देशमुख सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत.

Sharad Pawar Madha Lok Sabha | लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. आता या मतदारसंघातून आणखी एक बातमी समोर येतीये. शेकापचे युवक नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचे घोषित केलं होतं. माहितीनुसार रात्री उशिरा शरद पवार आणि अनिकेत देशमुख यांच्यात भेट झालीये आणि भेटीनंतर अनिकेत देशमुख यांचे बंड थंड झालंय. अनिकेत देशमुख सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. शरद पवार यांच्या सूचनेनंतर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड थंडावले आहे. शरद पवार यांनी तातडीने डॉ. देशमुख यांना तातडीने बारामती येथे बोलावून घेतले होते. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी समजूत घातल्यावर अनिकेत यांचे बंड थंड झाले आहे. डॉ. अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभं राहण्याची घोषणा केलीये. रात्रीत शरद पवार यांनी डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड थंड केलंय. आता अनिकेत देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत अशी माहिती समोर येतीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com