Lok Sabha Election 2024: शिवसेना खासदार कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार? शिंदेंच्या खासदाराबाबत मोठी बातमी

Lok Sabha Election 2024 News Today: एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या एका खासदाराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय. पालघरचे शिंदेचे खासदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधण आलंय. ते पालघरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचंही बोललं जातंय. दरम्यान, असं झालं, तर ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे शिवसेनेचे पहिले खासदार असतील. राजेंद्र गावित गेल्या दोन टर्मपासून पालघर लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. आता त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट मिळण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर एकनाथ शिंदेच्या समर्थनात असलेल्या नेत्यांची पालघरमध्ये नेमकी काय भूमिका असणार, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राजेंद्र गावित हे आधी भाजपमध्येच होते. मात्र नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, आता पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. जागावाटपाचा तिढा कायम असताना शिंदे गटाचे खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार का? या प्रश्नावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com