Ladki Bahin Yojna News : लाडकी बहीण योजनेसाठी कुठे आणि कसा करावा अर्ज?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रही लागणार आहेत.

राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेसाठी अर्जदार महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या योजनेसाठी अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे. या अर्जासोबत अर्जदाराला आधार कार्ड, डोमेसाईल, जन्माचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. त्यासोबत बँक पासबूकची प्रत, रेशन कार्ड, एक पासपोर्ट फोटोही लागणार आहे. यासोबत अर्जदाराला हमीपत्रही जोडावे लागणार आहे. हे हमीपत्र अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी आणि सुवीधा केंद्राकडून मिळेल. या योजनेसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com