Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, रक्षाबंधनाआधीच सरकारकडून ओवाळणी; ₹1500 खात्यात जमा

july installment ladki bahin yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. हा जुलै महिन्याचा हप्ता आहे. यामाध्यमातून रक्षाबंधनापूर्वी सरकारने लाडकींना ओवाळणी दिली.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारने ओवाळणी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांचं वितरण सुरु करण्यात आलं आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत. तर काहींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरु आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी चिंता करण्याचे कारण नाही. काही तासांत त्यांच्या देखील खात्यात पैसे जमा होतील. हे जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे होते. ऑगस्टचे १५०० रुपये कधी येणार? याची आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com