विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहीणींनी पुन्हा एकदा महायुतीला सत्तेच्या खुर्चीवर बसवले. मात्र त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असे बोलले जात आहे. तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. गुढीपाडवाला महिलांना पैसे मिळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाला सरकारने केराची टोपली दाखवत ते पैसे आता अक्षय तृतीयाला मिळणार असे सांगण्यात आले आहे. यावरच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले,शासनाचे पैसे आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणारच आहेत. सरकार इतरही योजना राबवत आहे, त्यामुळे बहिणीना या योजनेचे पैसे मिळायला उशीर होतो.पण योजना बंद होणार नाही असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.