
'केवळ ब्राह्मणच नाही तर आमच्यातल्या काही लोकांनी देखील फुलेंना विरोध केला. तर अनेक ब्राह्मणांनी फुलेंना मदत केली.', असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. पुण्यामध्ये आज महात्वा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ यांनी फुलेवाड्याला भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्यातर्फे महात्मा फुले समग्र वांगमय या पुनर्मुद्रित ग्रंथाचा वितरण समारंभ आणि महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार छगन भुजबळ यांनी हजेरी लावली.
छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'आज आनंदाची गोष्ट होत आहे. हा वाडा ज्यात ही विहीर आहे. त्यावेळीसचे मागास ज्यांना आपण पाणी प्यायला देत नव्हतो त्यावेळी फुलेंनी ही विहीर सगळ्यांसाठी खुली केली आणि त्यांच्यासोबत जेवले. सर्व महिलांना त्यांना आधार दिला होता. सर्वांना सांभाळलं. ज्या महिला गरोदर राहायच्या या महिलांना देखील आधार दिला. त्यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात पोस्टरस लावली होती की गरोदर असलेल्या महिलांनी आत्महत्या करू नका. आम्ही तुमचे आई-वडील आहोत. आमच्याकडे या बाळांतपण आम्ही करतो. आज सुद्धा हे शक्य नाही त्यांनी ते त्यावेळी केले होते.
छगन भुजबळांनी भिडे वाड्याच्या इतिहासाची सर्वांना आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, 'या वाड्याला मोठा इतिहास आहे. क्रांतीच पाणी इथून पेटलं. जगातील पहिली क्रांती या वाड्यातून झाली. आपण हा इतिहास विसरत जात आहोत हे दुर्दैव. केवळ ब्राह्मणच नाही तर आमच्यातल्या काही लोकांनी देखील फुलेंना विरोध केला. तर अनेक ब्राह्मणांनी फुलेंना मदत केली. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. इतिहास असल्याशिवाय तुम्ही भविष्य घडवू शकत नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा लढा ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता. अंधश्रद्धेच्या विरोधात होता ब्राह्मणवादाच्या विरोधात होता.'
तसंच, 'फुलेंच्या चित्रपटाला काही लोकं विरोध करत आहेत. चित्रपट बनवणारे लोकं म्हणत आहेत की जे सत्य आहे जे लिहिलं आहे तेच आम्ही मांडलं. सगळ्यांना विनंती आहे त्यावेळी जी परिस्थिती होती तशी आज नाही सगळं बदललं आहे. भिडे वाड्यासाठी अजित पवारांनी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकनाथ शिंदेने देखील १०० कोटी रुपये पाठवून दिले आहेत की काम सुरू करा. पण काम सुरू नाही झालं. जागा कमी पडत आहे. भिडे वाड्याचं काम लवकर सुरू करा. मला आंदोलन करण्याची वेळ आणू देऊ नका.', असे भुजबळ म्हणाले. तसंच, 'सिनेमाला विरोध करण्यापेक्षा त्यावेळेसचा इतिहास समजून घेऊया. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे सिनेमाला विरोध करू नका. लवकर हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे काम जगभरात जाऊ द्या', असं आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.