कोयना एक्स्प्रेसमधून धुराचे लोट; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या, नेमकं काय घडलं? VIDEO

Koyna Express Stopped For 10 Minutes At Karjat Railway Station: कर्जत स्थानकात कोयना एक्सप्रेस १० मिनिटे थांबवण्यात आली. एका डब्याजवळ ब्रेकमधून धूर दिसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तपासणीनंतर धोका नसल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूर–मुंबई ११०३० कोयना एक्सप्रेस शनिवारी सायंकाळी खंडाळा घाट उतरून कर्जत स्थानकात दाखल झाल्यानंतर एका डब्याजवळ ब्रेकमधून धूर येत असल्याचे दिसल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाडी १० मिनिटे थांबवली. गाडी थांबताच काही प्रवाशांनी घाबरून डब्यांमधून खाली उतरण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानकावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने ब्रेक यंत्रणेची तपासणी केली असता कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी ६:२६ वाजता कर्जतला आलेली कोयना एक्सप्रेस ६:३६ वाजता सुरक्षितपणे मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com