Pahalgam Attack: कुराणमधील कलमा बोलून दाखव म्हणत शुभमवर झाडल्या गोळ्या|VIDEO

Kalma Incident: जम्म-काश्मीर येथे जालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक 28 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला. कानपूर येथून आलेल्या एका पर्यटकाला दहशतवाद्यांनी कुराणमधील कलमा म्हणायला लावल्या.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कानपूर इथला व्यापारी शुभम द्विवेदी याचाही समावेश आहे. पत्नी आणि 11 सदस्यांच्या फॅमिली ग्रुपसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी एशान्या द्विवेदीशी झाले होते. लग्नानंतर शुभम आणि एशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबीयांसोबत फिरण्याचं ठरवले होते. शुभम आणि एशान्याचे कुटुंबीयसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते. दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्याने अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. शुभमचा हल्ल्याआधीचा कुटुंबासोबतचा व्हिडिओ आता समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com