अशोक खरातला भर चौकात गोळ्या घाला; कुणी केली मागणी? VIDEO

Kalicharan Maharaj Statement On Fake Babas In Maharashtra: धाराशिवमध्ये कालीचरण महाराजांनी भोंदू बाबांवर जोरदार टीका करत कॅप्टन अशोक खरातसारख्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

धाराशिवमध्ये खाजगी कार्यक्रमासाठी आलेल्या कालीचरण महाराजांनी भोंदू बाबांवर कडक शब्दांत टीका केली आहे. कॅप्टन अशोक खरातसारख्या भोंदू बाबांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी असेही सांगितले की, चुकीची कृत्ये करणाऱ्याला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. महाराजांना लोकांनीच महाराज केलेले आहे, मात्र धर्मालाच कलंक लावणारे महाराज असतील तर ते पापीच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, धर्मकार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नयेत असा कोणताही नियम किंवा बंधन नसल्याचेही त्यांनी नमूद केले. बलात्कारी कॅप्टन अशोक खरातमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी राजकीय वर्तुळासह सामाजिक स्तरातून देखील होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com