मंगळसूत्र चोर म्हणालो, पण...'नेमकं काय घडलं होतं? जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण | VIDEO

“I Called Him a Mangalsutra Thief, But…” मंगळसूत्र चोर’ या विधानावरून पडळकर-आव्हाड यांच्यातील वाद पेटला. विधानभवनात समर्थकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर खुलासा करत विधानसभेतील असुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘मंगळसूत्र चोर’ अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. त्यानंतर आता विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक आमनेसामने आले आणि जोरदार हाणामारी झाली. या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विधिमंडळातच आमदार सुरक्षित नसतील, तर अशा वातावरणात आमदार राहून काय उपयोग? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यानंतर त्यांनी आज साम टीव्हीशी संवाद साधत सर्व घटनाक्रम सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com