Maharashtra Politics: जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा; CM फडणवीसांकडून थेट सभागृहातच ऑफर, म्हणाले...VIDEO

Modi's Schemes Are Impressive Now: विधानसभेत कामगार योजना घोटाळ्यावरून जयंत पाटील आक्रमक झाले. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळात जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का, यावर तर्क-वितर्क सुरू आहेत.

जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना बांधकाम कामगार मंडळातर्फे महाराष्ट्रभर पेटी, भांडी वाटपाचा काम सुरू आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, प्रत्येकाच्या खात्यावर डीबीटी करा. असे असताना आपण ही योजना का सुरू ठेवली? मफतलाल हे कपडा बनवतात हे माहीत आहे. मात्र ते भांडी बनवतात हे माहीत नाही असे म्हटल. या प्रश्नाला आकाश फुंडकर म्हणाले, मफतलाल या निविदेत अपात्र झाले आहेत. 2020 मध्ये जयंत पाटील तुम्हीच या योजनेला मुदतवाढ दिली असून आपण राबवलेली योजना जी आम्ही चालवत आहोत असे फुंडकर म्हणाले. यावर जयंत पाटील यांनी पलटवार करत म्हणाले, प्रशासन मंत्र्याला कधीच सांगत नाही हे अयोग्य आहे.

ई-टेंडर प्रमाणे योग्य तो निर्णय द्यावा असा मंडळाने आदेश दिला. माझ्या आधी ही योजना सुरू होती. मंडळाने निर्णय घ्यावा असे आम्ही सांगितले अशी आठवण करून दिली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील साहेब सध्या तरी प्रश्न विचारू शकतात इतक्यात तरी उत्तर नाही देऊ शकत असा टोला लगावला.

यावर जयंत पाटील म्हणाले, ठराविक लोकांना काम द्यायचे हे मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. एजंटचा सुळसुळाट सुरू आहे असे जयंत पाटील म्हणाले.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्या आहेत. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली जाईल आणि जास्तीत जास्त पारदर्शक कारभार करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com