Pahalgam Attack: भारताच्या इशाऱ्याने पाकिस्तानची झोप उडवली, एलओसीवर सैन्यवाढ सुरू|VIDEO

Pakistan increases LoC troops : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची धर्म विचारून हत्या करण्यात आली. त्यानंतर भारताने दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली असून, पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचेही प्रयत्न सुरू केले आहेत. परराष्ट्र खात्याने अमेरिका, चीन, रशिया कॅनडा आणि इंग्लंडसह विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा सुरू केली आहे. तसेच पहलगममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं.

हा हल्ला करून भारतीय आत्मवरच हल्ला करण्याचे दु:साहस करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार दणका मिळेल, कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देण्यात येईल असा कठोर इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झाला असून तेथे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारताच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने एलओसीवर सैन्य वाढवले आहे. भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com