Sindoor Operation: सिंदूर ऑपेरेशननंतर पाकिस्ताचा लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीची पोकळ धमकी; म्हणाला|VIDEO

Pakistan Reacts to Sindoor Operation: पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चा महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाला की, भारताने जो काही हल्ला केला आहे त्याचा आम्ही बदला घेऊ अशी पोकळ धमकी त्यांनी दिली आहे.

सिंदूर ऑपेरेशन नंतर पाकिस्तानची कायमची झोप उडाली आहे. भारताने दिलेल्या प्रतिउत्तरानंतर पाकिस्तान लष्करचा मेजर जनरल अहमद शरीफने पत्रकार परिषद घेत पोकळ धमकी दिली. तो म्हणाला, भारताने पाकिस्तान विरोधात काही हालचाली करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान त्याच भाषेत उत्तर देईल अशी पांचट धमकी अहमदने दिली.

पुढे तो म्हणाला, भारताने कोटली, बाहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये भ्याड हल्ले केले. भ्याड शत्रू भारताने बहावलपुरच्या अहमद पूर्व भागात तीन ठिकाणी हवाई हल्ले केले. सुभानल्लाह मशीद, कोटली आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी हल्ले केले. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी याच उत्तर देईल असे अहमद बरळला. भारताने केलेल्या हल्ल्यात एक निर्दोष मुलगा शाहिद झाला आणि एक महिला तसेच एक पुरुष गंभीर जखमी आहे. भारताने मध्यरात्री निर्दोष पाकिस्तानी नागरिकांवर भ्याड हल्ला केला असे ही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com