India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Donald Trump: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला विराम लागला आहे.

आज पाच वाजेपासून दोन्ही देशांनी युद्धाला विराम देण्याची सहमती दर्शवली आहे. याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारताने आपल्या अटींवर युद्धविराम लावला आहे.

मागच्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तीव्र संताप व्यक्त करत पाकिस्तान येथील दहशवादांचे अड्डे उध्वस्त करून लावले. त्यानंतर पाकिस्तानने हल्ले करत भारतीय सैन्य आणि सामान्य व्यक्तींना लक्ष केले यामध्ये अनेक जण जखमी होऊन काही जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले.

मात्र, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत मोठी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर मी आनंदाने हे जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्ध बंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा समजदारपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असे ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com