Kishor Jorgevar : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार 'तुतारी' फुंकणार; पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

MLA Kishor Jorgevar Joining Sharad Pawar Group : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे आज शरद पवार यांच्या गटात पक्ष प्रवेश करत आहेत. तुतारी या चिन्हावरून ते आता चंद्रपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या गळाला आणखी एक उमेदवार लागला आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे तुतारी हाती घेणार असून थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. जोरगेवार हे शरद पवार यांच्या गटातून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

किशोर जोरगेवार हे यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. या आधी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला पाठिंबा दिला होता. यावेळी ते शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर चंद्रपूर विधानसभेतून निवडणुकी लढवणार आहेत. थोड्याच वेळात जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा चंद्रपूरमधून राष्ट्रवादीला होणार आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com