Indapur News : ताई-दादांमध्ये अबोला; सुप्रिया सुळे - अजित पवारांनी एकमेकांकडे बघणंही टाळलं | Video

Ajit Pawar - Supriya Sule News : इंदापूर येथील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात समोरासमोर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात समोरासमोर आले होते. मात्र यावेळी दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. तर दुसरीकडे अजित पवार यांना सोडून गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी मात्र अजित पवारांना आवर्जून नमस्कार केलेला दिसला.

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ या न्यायालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार न्यायमूर्ती श्रीमती रेवती डेरे

यांच्यासह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे व हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. मात्र यावेळी अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहण देखील टाळले. तर कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत हातात हात देऊन काही वेळ चर्चा देखील केली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी देखील हस्तांदोलन करीत काही काळ चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com