Imtiaz Jaleel : बापाचंही नाव बदला; खुलताबाद नामकरणावर इम्तियाज जलील यांची जीभ घसरली, VIDEO

Khulatabad Renaming: छत्रपती सांभाजीनगरचे माजी खासदार यांनी नामकरणाच्या मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

खुलताबादचे रत्नपूरमध्ये नामांतर आणि वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तुफान हल्ला चढवला आहे. त्यांनी नाव बदलण्याच्या राजकारणावरून भाजप आणि शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं.

जलील म्हणाले, जितकं नाव बदलायचं आहे, तितकं बदला देशाचंच नाव बदलून मोदीस्थान ठेवा. देशाला मोदींचं नाव द्या. त्यांना देवाचा दर्जा दिला आहे ना? मग एकदा हे सगळं संपवून टाका, म्हणजे आम्ही विकासावर बोलू शकू.

दररोज गावांचं नाव बदला, शहरांचं नाव बदला हे काय? एकदा सगळंच बदला बापाचं नावही बदला. मी बोलतो तेव्हा काहींचा इगो दुखतो कारण ते रिकामटेकडे लोक आहेत. त्यांचं शिक्षणही अपुरं आहे. शिवाजी महाराजांचा केवळ पुतळा माहिती असणाऱ्यांना माझ्याशी चर्चेला बसवा, मग कळेल. अशी जहरी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com