Uddhav Thackeray Speech Amravati |"अपमानाचा सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही", उद्धव ठाकरे कडाडले!

"मला खात्री आहे की या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक हा कधीही गद्दाराला साथ देणार नाही. अपमानाचा सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवसेना जे करते ते समोरून करते मागून वार करणारी आमची औलाद नाही."

Uddhav Thackeray Speech Amravati | अमरावतीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगलीच सडकून टीका केलीये. "मला खात्री आहे की या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिक हा कधीही गद्दाराला साथ देणार नाही. अपमानाचा सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवसेना जे करते ते समोरून करते मागून वार करणारी आमची औलाद नाही." आता गल्लीबोळातही जाणारे पंतप्रधान...या देशाचे काळजीवाहू पंतप्रधान आमची युती असताना कितीवेळा महाराष्ट्रात आले होते आणि आता किती वेळा येताहेत? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. "येतात आणि जातीय समीकरणाचे पिल्लू सोडतात. काल एका कुठल्या तरी सभेत म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुले होतील त्यांना संपत्ती वाटून टाकेल. अहो मग तुम्ही दहा वर्षे तिथे बसला होता तेव्हा कमी मुले होती त्यांना का नाही वाटलीत?" असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com