Solapur ZP School News: Special Report: जिल्हा परिषदेच्या शाळेवर हाऊसफुल्लचा बोर्ड!

शाळेमध्ये एखादा उपक्रम राबवायचं असेल तर याबाबत सर्वात आधी गावातील लोकांना माहिती दिली जाते. त्यानंतरच उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवेश बंद असे फलक या शाळेने लावला आहे.

Solapur News: एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना सोलापुरातील  मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्याच दिवशी हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जास्त गुणवत्तेत अग्रेसर असणारी आणि सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून पापरी येथील जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे.या शाळेचा गेल्यावर्षी ७४३ इतकी पटसंख्या होती.तर २०० हून अधिक विद्यार्थी आज प्रतीक्षा यादीत आहे.या शाळेत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम उपलब्ध आहेत. पापरी येथील शाळेला 15 वर्षांपूर्वी ISO मानांकन प्राप्त झाले आहे.या शाळेमध्ये पापरीतील विद्यार्थीच नाही, तर इतर 5 ते 6 गावांमधील विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहे.या शाळेला आतापर्यंत 13  पुरस्कार मिळाले आहेत. बघुयात या शाळेवरचा हा खास रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com