Ravikant Tupkar: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची राख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवणार|VIDEO

Farmers Send Ashes To Maharashtra Government: हिंगोली येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मोर्चा काढला जाणार असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी बाजीराव वडकुते यांच्या राखीचं मडकं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे.
  • हिंगोली येथे शेतकरी कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा मोर्चा.

  • बाबुळगावचे आत्महत्याग्रस्त शेतकरी बाजीराव वडकुते यांच्या राखीचं मडकं सरकारला पाठवण्याची घोषणा.

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना राख पाठवली जाणार.

  • आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार असून, सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सरकारने शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन फसवे निघत असल्याने रविकांत तुपकर यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आता सरकारच्या विरोधात आक्रमक झाली आहे. आज हिंगोलीमध्ये जिल्हा कचेरीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान बाबुळगाव येथील वयोवृद्ध आत्महत्याग्रस्त शेतकरी बाजीराव वडकुते यांच्या शरीरातील राख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पाठवण्यात येणार आहे, बाभूळगावचे शेतकरी बाजीराव वडकुते यांनी 30 जुलै रोजी सततचा दुष्काळ व नापिकीला कंटाळून स्वतःच जीवन संपवलं होतं. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं,

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शरीराची राख मडक्यात भरून ठेवत सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला होता, आता हीच राख आजच्या मोर्चादरम्यान सरकारला पाठवण्यात येणार आहे. सरकारच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com