Mumbai VIDEO: थोड्याच वेळात मुंबईमध्ये हाय टाईड, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

High Tide In Sea: मुंबईमध्ये हाय टाईड मुळे उंच लाटा उसळण्याचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

मुंबई आणि उपनगरामध्ये आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. दुपारी समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असून ४.४० उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्यरात्री पासूनच मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. सखोल भागात पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे. हाय टाईड मुळे उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com