Rain Alert : कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार; अंबरनाथमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

Heavy Rain in Mumbai and suburban : मुंबईसह उपनगरे आणि ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला.

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अंबरनाथमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. जवळपास अर्धा ते पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली होती.

कल्याण डोंबिवलीतही विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. त्यानंतर पावसानं झोडपून काढले. काही वेळाने पावसाचा जोर ओसरला असला तरी, ऑफिसवरून येणाऱ्या नोकरदारवर्गाची आणि बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पळापळ झाली.

मुंबईसह उपनगरांतही पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी तर संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. पुढील तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नागरिकांची घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com