Heavy Rain Alert : १३ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

india weather alert heavy rain thunderstorm warning in 13 states : देशातील १३ राज्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात गारपीटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

देशातील १३ राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरीसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांपर्यंत जोरदार पाऊस, वादळी वारे आणि वीज कोसळण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

१० ते १२ मे या कालावधीत उत्तर पश्चिम भारतात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी या भागात ६-७ दिवसांपर्यंत मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. बिहार, विदर्भ आणि तेलंगणामध्ये गारपिटीची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com