Video: पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

आजच्या सुनावणीनंतर पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की तो फेटाळला जाणार याकडे लक्ष

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणारे. पूजा खेडकर यांना कोर्टाने दोन वेळा अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला होता. कालच पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात रिजॅाईंडर दाखल केलंय. त्यात पूजा खेडकरने UPSC चे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. UPSC च्या आरोपात तथ्य नसल्याचं पूजा खेडकर यांचे म्हणणं आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप UPSC नं केला होता. नाव बदलल्याची माहिती यापूर्वीच UPSC कडे दिली असल्याचं पूजा खेडकरनं रिजॅाईंडर मधे स्पष्टीकरण दिलंय. पूजा खेडकर यांच्या या प्रकरणात एकटीचा हात आहे की यात आणखी कोण कोण सहभागी आहे हे शोधण्यासाठी पूजाला अटक करण्यात यावं अशी मागणी UPSC कडून प्रतिज्ञापत्रात केली गेली आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीनंतर पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की तो फेटाळला जाणार याकडे लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com