Gopichand Padalkar: ...तर 'त्या' ख्रिश्चन फादरला ठोकून काढू; गोपीचंद पडळकर संतापले, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Christian Priest Will Be Thrashed: सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी येथे बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजातील फादरना इशारा दिला आहे, जबरदस्तीने धर्मांतरणाचा प्रयत्न केल्यास त्यांना ठोकून काढू.

सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी एका 7 महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली होती. सासरच्या मंडळीकडून वारंवार धर्मांतरासाठी तिच्यावर जबरदस्ती केली जात होती. या वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून या गर्भवती महिलेने आत्महत्या केली होती. सासरच्या निर्दयी लोकांकडून ऋतूजाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी छळ केला जात होता. या घटणेमुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर दखल घेत ख्रिश्चन धर्मांतरण करणाऱ्या फादरला सणसणीत इशारा दिला आहे. जबरदस्तीने धर्मांतरणाचा प्रयत्न केल्यास त्यांना ठोकून काढू. तसेच त्या फादरलाही धरून ठोकू असा संतापजनक इशारा गोपीचंद पडळकर यांनी जबरदस्ती ख्रिश्चन धर्माच्या टोळीला दिला आहे. तसेच धर्मांतरण विरोधात कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यामुळे जबरदस्ती धर्मांतरण करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com