Crop insurance Video: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदाही 1 रुपयांत पिकविमा

Crop insurance: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाही एक रुपयात मिळणार पीकविमा मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी केलीय.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना यंदाही एक रुपयात पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केलीय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय. पीक विम्याचा कोणता लाभ मिळणार प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यास नुकसान भरपाई मिळेल.

पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग लागली. यात वीज कोसळल्यानं पीक जळले तर नुकसानभरपाई मिळते. तसेच गारपीट, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलयम होणं, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड आणि रोग आदीमुळे बाबींमुळे उत्पन्नात घट झाल्यास नुकसान भरपाई मिळेल. तसेच स्थानिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते त्याचीही भरपाई मिळतं. नैसर्गिक कारणामुळे पिकांच्या काढणी पश्चात होणाऱ्या नुकसानाची भरपाई फक्त एक रुपयांच्या पीकविम्यात मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com