Goa Heavy Rain News : गोव्यात तुफान पाऊस; पाण्याच्या लोटात बाईकस्वार गेला वाहून, धडकी भरवणारा व्हिडिओ

Goa Heavy Rain update : गोव्यात तुफान पाऊस बरसतोय. या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्याच्या लोटात बाईकस्वार वाहून गेल्याची घटना घडली.

महाराष्ट्राबरोबरच गोव्यातही तुफान पाऊस कोसळतोय. पाण्याच्या लोटात बाईकस्वार वाहून गेला आहे. गोव्यातील खोर्ली उसपकर जंक्शनवर ही घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने पाण्याच्या लोटात दुचाकीस्वार वाहून गेला आहे. मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील लोकांना बसला आहे. पाण्यात वाहून गेलेल्या बाईकस्वाराविषयी अधिकची माहिती मिळालेली नाही. या बाईकस्वाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे गोव्यातील पावसाचा फटका कार चालकांनाही बसताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com