अरुण गवळींची कन्या गीता गवळींची भाजपमध्ये एन्ट्री? 'त्या' कृतीनं चर्चांना उधाण, मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी|VIDEO

Geeta Gawli Meets Ashish Shelar: दगडी चाळचे नेते अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

दगडी चाळचे अरुण गवळी यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांची नुकतीच भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दगडी चाळने महायुतीला सक्रिय पाठिंबा दिला होता.

त्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठीही गवळी गट भाजपसोबत हातमिळवणी करणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. या भेटीत संभाव्य राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपकडून मुंबईतील पारंपरिक मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून, स्थानिक प्रभावशाली गटांशी समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात गवळी गटाचा पाठिंबा मिळाल्यास युतीला काही ठिकाणी महत्त्वाचे बळ मिळू शकते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com