Gajanan Kirtikar: मतमोजणीत संशयास्पद गोष्टी! - गजानन कीर्तिकर

या मतदारसंघात झालेल्या फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर पराभूत झाले. अमोल यांचा अत्यंत थोडक्या मतांनी पराभव झाला.

Gajanan Kirtikar News: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबतची अजूनही चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून ईव्हीएम मशीन आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच या निकालावरून ठाकरे गटाला फटकारलं होतं. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त करणारं विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टी संशयास्पद होत्या. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कलेक्टरने वंदना सूर्यवंशी यांना आरो म्हणून नेमलं. वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी काय? त्या संशयास्पद व्यक्ती आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडून ही संशयास्पद कृती झाली आहे. त्याबद्दल त्यांना कोर्टात सफाई द्यावी लागेल, असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com