अजितदादांची अस्थिविसर्जन करण्यासाठी माजी आमदाराने थेट नदीत उडी मारली अन्..,VIDEO

Atul Benke tribute during Ajit Pawar ash immersion ceremony: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिविसर्जनावेळी पुणे जिल्ह्यातील कुकडी नदीत माजी आमदार अतुल बेनके थेट पाण्यात उतरले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्य हे दु:खाच्या सावटाखाली जगत आहे. हा दु:खाचा डोंगर राजकीय वर्तुळावरच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांवर कोसळला आहे. बुधवारी 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात झाला आणि त्यांचा यामध्ये मृत्यू झाला. यानंतर अजित दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण राज्यात अजित पवार यांच्या अस्थि त्या त्या आमदाराने आणून त्याचे विसर्जन केले.

अशातच पुणे जिल्हयातील कुकडी नदीत अजित पवारांच्या अस्थिकलश विसर्जनावेळी माजी आमदार अतुल बेनकेंनी थेट नदीपात्रात उडी घेऊन दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अष्टविनायकांपैकी ओझर गणपतीच्या साक्षीने आज कुकडी नदीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन विधिवत पार पडले. या विधीवेळी माजी आमदार अतुल बेनके स्वतः पाण्यात उतरले आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भावनिक वातावरणात दादा अमर रहेच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनीही अश्रुपूर्ण निरोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com