Ghatkopar Rickshaw Fire: घाटकोपरमध्ये रिक्षांना अचानक भीषण आग; मोठं नुकसान

Fire News Mumbai: मुंबईतील घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षांना भीषण आग लागली. या घटनेत 8 पेक्षा जास्त रिक्षांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मुंबईतील घाटकोपर परिसरातील छेडा नगरमध्ये पुलाखाली उभ्या असलेल्या रिक्षांना आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडलीये. आग वेगाने पसरल्यामुळे संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत आठपेक्षा जास्त रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग लागण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून, अधिक तपास सुरू आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com