प्रसिद्ध 'मातोश्री' हॉटेलवर FDAचा दणका; बिर्याणीत झुरळ निघाल्यानंतर कारवाई

dharashiv news : प्रसिद्ध 'मातोश्री' हॉटेलवर FDAने दणका दिला आहे. बिर्याणीत झुरळ निघाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिवमधील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली आहे. आठ दिवसांपूर्वी जेवायला आलेल्या ग्राहकाच्या प्लेटमधील बिर्याणीत झुरळ निघाल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. साम टीव्हीच्या बातमीनंतर अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडवर आली आहे. चार जणांच्या पथकांकडून मातोश्री हॉटेलच्या मुख्य शाखेतील स्वच्छतेची कसून तपासणी करत बिर्याणीचे नमुने घेतले. सहआयुक्त कार्यालयाकडे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. तसेच मातोश्री हॉटेल मालकाला अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com