FASTag Insurance Check: वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी, इन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास १०,००० रुपयांचा दंड

FASTag Insurance Update: महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी आहे. इन्शुरन्सशिवाय गाडी चालवल्यास १०,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता टोल प्लाझा ओलांडताना फास्टॅगद्वारे केवळ टोलच नव्हे तर वाहनाच्या विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. विमा संपला असल्यास मोबाईलवर एसएमएस अलर्ट येईल. हा दंड नसून केवळ रिमाइंडर असेल जेणेकरून वाहनधारकांना विमा नूतनीकरण करता येईल. नियमाचे उल्लंघन केल्यास ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड द्यावा लागू शकतो. सध्या दिल्लीतील मुंडका टोल प्लाझावर प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा सुरू झाली असून लवकरच देशभरात लागू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित डेटा शेअरिंगवर आधारित आहे. टोल प्लाझावरील यंत्रणा राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वाहन डेटाबेसशी जोडण्यात आली आहे. जर एखादे वाहन टोल प्लाझावरून जाताना कॅमेरे आणि संबंधित यंत्रणा वाहनाचा क्रमांक वाचतील. त्यानंतर वाहन डेटाबेसमध्ये त्या वाहनाच्या इन्श्यूरन्सची वैधता तपासली जाईल. वैधता संपली असेल तर वाहन मालकांना मेसेज जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.