VIDEO: Nandurbar जिल्ह्यात बोगस कागदपत्रांचा सुळसुळाट, चक्क 500 रुपयात बोगस जातीचा दाखला

Nandurbar News : जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे मिळतात अवघे काही मिनिटात, सायबर कॅफे वर मिळतो चक्क 500 रुपयात बोगस जातीचा दाखला

नंदुरबार: जिल्ह्यात बोगस कागदपत्रांच प्रमाण वाढला आहे. बोगस प्रमाणपत्र तयार करण्यास ग्रामपंचायतींचे काही ऑपरेटरचा देखील हात असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे महाराष्ट्रात जातीय राजकारण तापलं असून आरक्षणासाठी उपोषणे करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे शाळा महाविद्यालय सुरू झाली असून विद्यार्थ्यांना जातींच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असतात. तर याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थी आणि पालकांकडून 500 रुपये घेत अवघ्या 5 मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com