VIDEO: वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अपमान, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde on Waghnakh News: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आज जल्लोषात साताऱ्याच्या संग्रहालयात दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टीकाकरांना प्रत्युत्तर.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आज जल्लोषात साताऱ्याच्या संग्रहालयात आणण्यात आली. वाघनखांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं आहे. वाघनखं साताऱ्यात आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाल्याचं शिंदे म्हणाले. शिवरायांनी संपवला अफझल खान आणि ही वाघ नखं आपल्या महाराष्ट्राची शान असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वाघनखांचं स्वागत केलं आहे. काही लोक त्याच्या वर शंका उत्पन्न करतात हे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेली वाघनखं येतात हे बघून स्फूर्ती आली पाहिजे, पण काही लोकांना राजकारण करून गालबोट लावयचं असतं असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर टीका केली आहे. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अपमान करण्या सारखं असल्याचंही शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com