Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री करतो असं उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, एकनाथ शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मोठा गौप्यस्फोट करत ठाकरेंवर हल्लाबोल केला.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तुम्ही सोबत या असं ते म्हणाल्याचं सांगत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. फडणवीसांनी जे सांगितलं त्यात तथ्य आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनीही त्याला दुजोरा दिला. त्याचबरोबर शिंदे यांनीही एक गौप्यस्फोट केला. जेव्हा आम्ही बाहेर गेलो, तेव्हाही ठाकरेंनी प्रयत्न केले. मलाही सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करतो. परत या.; पण आम्ही वैचारिक भूमिका घेऊन गेलो. मलाही निरोप दिला. दिल्लीलाही फोन केला. तिथंही प्रयत्न केले. संपूर्ण शिवसेना सोबत येईल असे सांगितले, पण शिवसेना आमच्याकडे होती. ५० लोक आमच्यासोबत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोलले तेच सत्य आहे. तीच वस्तुस्थिती होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com