Video: एकनाथ शिंदे-सलमान खान भेटीत काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं!

Salman Khan News:

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खान यांची भेट घेतली. मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंट या ठिकाणी ही भेट पार पडली. यावेळी गोळीबार प्रकरणावरून दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांना सुरक्षेची पूर्ण हमी दिली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली. सलमान खान यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. दरम्यान, काल रात्रीही मुख्यमंत्र्यांनी सलमान खान याची घरी भेट घेतली होती. त्यानंतर आज झालेल्या भेटीत दोघांमध्ये सविस्तर चर्चाही झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com