Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाण्याची शक्यता

CM Eknath Shinde will meet Amit Shah in Delhi : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहू शकतात.

आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील निवडणुका असल्या तरी दिल्लीत खलबतं सुरू झालेली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री तातडीने दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत आहेत. तर अजित पवार बैठकीसाठी जाणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. फडणवीस हे दिल्लीतच असल्याने या बैठकीला तेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर आजची बैठक केवळ शिवसेना आणि भाजपबाबतच असेल असे सांगण्यात येत आहे. महायुतीच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी ही बैठक होणार असल्याचे तिला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com