Jalgaon Drunk & Drive प्रकरणात Eknath Khadse यांचा Ajit Pawar गटावर गंभीर आरोप

पुणे हिट अँड रनची पुनारावृत्ती जळगावमध्ये घडली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

पुण्याप्रमाणे जळगावमध्येही हिट अँड रन ची घटना घडली होती. या घटनेवरून एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण राजकीय दबाव आणून दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच या प्रकरणात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचा मुलाचा संबंध आहे असेही खडसे म्हणाले. या प्रकरणात आरोपांनी इतके दिवस हॉस्पिटलमध्ये का ठेवण्यात आलं असा सवाल खडसे यांनी विचारला. या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com