Rupali Chakankar: मोठी बातमी! रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या, ईडीने समन्स बजावला

ED Summons To Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयनंतर आता ईडीने त्यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त असताना झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्यासंदर्भात रूपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अशोक खरातने खंडणी रॅकेट चालवून बेनामी बँक खात्यांच्या नेटवर्कमधून ७० कोटींपेक्षा जास्त रक्क वळवल्याचा आरोप आहे. अशोक खरातच्या खरातच्या शिवनिका ट्रस्टवर रुपाली चाकणकर विश्वस्त होत्या. त्यांनी पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार झाले का याचा तपास ईडीच्या माध्यमातून केला जाणार आहे. रुपाली चाकणकर यांची याआधी सीबीआयने तब्बल ५ तास चौकशी केली होती. आता या प्रकरणात ईडीने एन्ट्री केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com