नाशिकमधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चाकू, कंडोमसह आक्षेपार्ह वस्तू आढळल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आता धाराशिवमधील शाळकरी मुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळकरी मुलं नशा करताना आढळून आले. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात शाळकरी मुलांकडून सुलोचनची नशा केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वर्दळीच्या ठिकाणी बाजारात बसूनच प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सुलोचन टाकून नशा करताना दोन शाळकरी मुले व्हिडिओत दिसत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. एकीकडे धाराशिव जिल्ह्यात ड्रग्सचा विषय गाजत असतानाच, शालेय विद्यार्थी सुलोचनची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.