Vidyanand Bapat Viral Marathi Gets Praise From CM Fadnavis : पुण्यातील गणेशोत्सवात डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट अस्खलित, शुद्ध मराठी आणि इंग्रजीत ज्या प्रकारे मुद्दे मांडत आहेत, त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे त्यांची मराठी सोशल मीडियावर इतकी व्हायरल झाले की, त्यावर मीम्सचा पूर आला आहे. आपले मुद्दे जोरकसपणे मांडण्याची त्यांची शैली सगळ्यांनाच आवडत आहे. बापट यांच्या शुद्ध मराठीबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केलं.
एक गोष्ट नक्की आहे की मराठीच्या शुद्धतेचा नमुना त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतो. आता अपेक्षा एवढीच आहे की त्यांची अतिशय सुंदर मराठी आहे, ती ऐकताना आनंद होतो, तसं विचार मांडताना, त्याचा इतरांना फार त्रास होणार नाही किंवा शुद्ध मराठीत मांडतो, तसं अधिक सर्वसमावेशक पद्धतीने ते मांडतील अशी अपेक्षा आहे. बापट यांच्या मराठीचं कौतुक करताना मला आता ट्युशनच घ्यावं लागेल, असं मिश्किल भाष्यही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.